आम्ही काय करतो

उत्क्रांती.ऑर्ग प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे. ही संस्था समाजातील सर्व कुटुंबाना पुढील पिढीच्या प्रगतीचे आकलन, योजना आणि अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहन देते. ही उन्नती केवळ नशिबाने आलेली नसावी – पण ही एका नियोजनबद्ध प्रयत्नांतून साकार झालेली असावी.

उत्क्रांती.ऑर्ग संस्था तिची दृष्टी आणि मिशन चालविण्यास खालील उपक्रम राबविते:
१. प्रत्येक कुटुंबाला वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्याची पुढची पिढी कशी वाढवावी यासाठी योजना आखण्यासाठी माहितीपूर्ण वेबसाइट चालू ठेवणे. या वेबसाइटवर सर्व प्रकारच्या सामाजिक गटांतील कौटुंबिक यशोगाथांची माहिती आहे – अशी कुटुंबे ज्यांनी पुढच्या पिढीसाठी नवी उंची गाठून यश संपादन केले आहे. या कथा प्रत्येक नवीन कुटुंबाने आपल्या जीवनास चांगल्या योजना बनविण्यास प्रेरणा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहेत.
२. स्वयंसेवकांच्या मदतीने उत्क्रांतीचे महत्त्व वाढविण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे. जेव्हा शक्य असेल तेव्हा बातम्यांचे वृत्तपत्र, रेडिओ इ. विविध चॅनेलचे लाभ घेऊन जागरुकता वाढविणे.
३. स्वयंसेवकांच्या मदतीने, ज्यांच्या करिअरची नुकतीच सुरुवात झाली आहे आणि ज्यांचा नव्याने विवाह झाला आहे अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि सर्वांगीण नियोजनाचे महत्त्व समजावून सांगणे.
४. सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मत करून नेत्रदीपक उन्नती केलेल्या कुटुंबांना पुरस्कार देण्याची भविष्यात योजना आखणे