काही वर्षांपूर्वी मी एका मोठया हाऊसिंग सोसाटीमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केले होते, ज्यात २४ इमारती उभ्या राहणार होत्या. माझी तिसरीच इमारत होती जिचे बांधकाम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले होते आणि मी अपार्टमेंटमध्ये राहायला आलो. पुढील इमारतींसाठी बांधकाम चालू राहणार होते.
हाउसिंग कॉम्प्लेक्स सेवेचा भाग म्हणून, बिल्डिंगमधील प्रशासकीय मंडळाने अण्णा (नाव बदलले आहे) याची इमारतीतील प्रत्येक घरातून कचरा गोळा करण्यासाठी भरती केली होती. अण्णा, त्याची पत्नी व मुलगा रोज सकाळी प्रत्येक घरातील कचरा एक कंटेनरमध्ये गोळा करीत. तो कंटेनर मग महापालिकेच्या कचरा संकलन ट्रकद्वारे उचलण्यासाठी मोठ्या खड्ड्यामध्ये रिकामा करण्यात येत असे.
पुढील वर्षी, चौथी इमारत पूर्ण झाली आणि मला अण्णाची मुलगी कचरा संकलन टीममध्ये दिसू लागली. काही वर्षांनंतर, माझ्या लक्षात आले की अण्णाची आता चार मुले आहेत जी त्याच्या टीमचा भाग होते, आणि कचरा संकलन कर्तव्यासाठी त्यांना प्रत्येकी इमारतींचे वाटप केलेले होते. मी अण्णाला बोलावले आणि विचारले – तुम्हाला पोट भरण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात. मग आपण आपले कुटुंब वाढवत का नेत आहात? त्यांनी उत्तर दिले “मोठ्या कुटुंबासह मी आता अधिक कचरा गोळा करण्यासाठी आणि अधिक पैसे कमविण्याची अधिक आणि अधिक इमारतींमध्ये सेवा करण्यास सक्षम आहे”.
मला धक्का बसला आणि बराच वेळ याचा विचार केला. अण्णा अधिकाधिक इमारतींमध्ये कचरा संकलनाची सेवा देता यावी म्हणून कुटुंब वाढवत आहे. त्याला लक्षात येत आहे का कि तो स्वतःच्या छोट्याश्या फायद्यासाठी कचरा गोळा करणाऱ्या मुलांना जन्म देत आहे? तो आपल्या संपूर्ण क्षमतेची (वित्तीय, सामाजिक इत्यादी) मोजमाप करण्यास असमर्थ का आहे? त्याला हे का समाजत नाही कि त्याने छोट्या कुटुंबाला मर्यादित केले तो त्यांची उत्तम काळजी घेऊ शकला असता? कि पुढच्या पिढीला पुढच्या पातळीवर नेण्याची आकांक्षाच नाहीये?
आपल्या समाजात अनेक अण्णा सारखे लोक आहेत. स्वत: च्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत असताना ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांना उंचावण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याचा विचार देखील करू शकत नाहीत. उत्क्रांती.ऑर्ग ची स्थापना आपल्या समाजातील कुटुंबाना पुढील पिढीच्या उंचींचे आकलन, योजना आणि अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी करण्यात आली आहे. ही उन्नती केवळ नशिबाने आलेली नसावी – पण ही एका नियोजनबद्ध प्रयत्नांतून साकार झालेली असावी.
उत्क्रांती.ऑर्ग चा विश्वास आहे की जेव्हा प्रत्येक पालक त्यांच्या पुढच्या पिढीला उन्नत करू शकतील, तेव्हा आपला समाज अपेक्षित स्थितीतील आनंद आणि समाधानाकडे जाइल, जेथे समाजाला अनाथाश्रमाची आवश्यकता नसेल, बाल संगोपन केंद्रे किंवा वृद्धाश्रमांची आवश्यकता अगदी नगण्य आणि फक्त अतिशय विशिष्ट परिस्थितीतच लागेल.
प्रत्येक कुटुंब योग्य आकाराचे, निरोगी, आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल – ज्यामुळे एक समृद्ध आणि प्रगतिशील समाज आणि देश निर्माण होईल.