आपण कशी मदत करू शकता

आपण उत्क्रांती.ऑर्ग च्या दृष्टी आणि उद्देशा मध्ये खालीलप्रकारे भाग घेऊन मदत करू शकता:
१. कौटुंबिक उत्क्रांतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आणि कुटुंबांना नवीन उंची गाठण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जागरुकता बैठका आयोजित करणे.
२. आपल्या भागातील ज्या कुटुंबांनी नवीन उंची गाठण्यात यश मिळविले आहे त्यांच्या यशोगाथा गोळा करणे, ज्यांचा उपयोग इतरांना वाचण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी होईल.
३. अशा तरुण व्यक्तींना भेटणे की ज्यांनी नुकतेच शिक्षण पूर्ण केले आहे, करिअरची सुरुवात केली आहे आणि लग्नकरून कौटुंबिक जीवन सुरु करण्याची योजना आखली आहे.
४. आपल्या भागातील नवीन विवाहांची माहिती मिळविणे. लग्नानंतर काही कालावधीनंतर त्यांना भेटून आयुष्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता समजावून सांगणे आणि आपल्या वेब साईटवर माहिती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणे.

अधिक माहितीसाठी खालील पृष्ठांना भेट द्या:
स्वयंसेवक होणे
जागरुकता पसरविणे