हे एक आव्हान

आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे जेव्हा आपण आपले करियर सुरू करतो आणि विवाहित होऊन कौटुंबिक आयुष्य सुरु करतो.

खालील आकृती जीवनाच्या चार टप्प्यांची माहिती देते:

आपल्या आयुष्यात ‘करिअरची सुरुवात आणि विवाह’ हा टप्पा किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्या टप्प्याचा आपल्या स्वतःच्या जीवनावरच नाही तर आपल्या मागील पिढीवर (आपले आई-वडिल आणि इतर वडीलधारे) आणि पुढील पिढीवर (आपली मुले आणि लहान भावंडे) यांच्यवर कसा प्रभाव पडतो हे खालील आकृतीवरून स्पष्ट होईल.

‘करिअरची सुरुवात आणि विवाह’ या सर्वात महत्वाच्या टप्प्यावर लक्ष दिले नाही तर तुम्हाला कुटुंबाचे (ज्यात मुले, वृद्ध पालक आणि कदाचित काही नातेवाईक असतील) व्यवस्थापन करण्यासंबंधी अनेक निर्माण होतील.

कथा नारायण यांची – ‘करिअरची सुरुवात आणि विवाह’ या टप्प्यातला नियोजनाचा अभाव जीवनावर कसा परिणाम करतो

नारायण पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी शहराजवळील लांबच्या गावात एका लहानशा घरात राहतात. ते अशिक्षित आहेत, १० किलोमीटर अंतरावर असलेल्या राइस मिलमध्ये कामगार म्हणून काम करतात. त्यांना १ मोठी बहीण, २ छोटया बहिणी आणि एक धाकटा भाऊ आहे. त्याचे आईवडील त्यांच्याबरोबर आहेत जे सतत आजारी असतात. मोठया बहिणीचा विवाह झाला आहे आणि शेजारच्या गावात राहते. मोठया बहिणीच्या लग्नासाठी पालकांनी सर्व साचवलेले पैसे खर्च केले आहेत आणि नवीन उत्पन्नाचा त्यांना काही स्रोत नाही. नारायण एकटेच कमावते आहेत आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी गेल्या वर्षी विवाह केला आहे आणि त्याची पत्नी गरोदर आहे. नारायण दिवसाला १६ तास काम करत आहेत तरीही सर्व कुटुंब सांभाळणे अत्यंत कठीण जात आहे.

नारायण या परिस्थितीत कसे आले? त्याच्या पालकांनी, आपल्या नोकरीच्या काळात, कशासाठीही योजना आखली नाही. ते किती पैसे कमावत आहेत, त्यांनी कोणत्या प्रकारच्या बचत कराव्या लागतील, किती मुले प्रभावीपणे वाढविण्यास ते सक्षम आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत काय करावे – कशाचेच नियोजन नव्हते.

अशा कठीण परिस्थतीत नारायण आई-वडिलांची योग्य सेवा करू शकत नाहीत. आपल्या लहान भावंडांच्या शिक्षणाचा व विवाहाचा खर्च कसा करायचा ते कळत नाही. आणि त्यांना स्वतःच्या येऊ घातलेल्या बाळाचे चांगले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी काही करता येईल का ते पण माहिती नाही. ही परिस्थिती त्यांना आजारी आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवायला भाग पाडेल का? त्यांच्या मुलाला त्याच तांदळाच्या कारखान्यात कामगार म्हणून काम करावे लागेल का? ते आपल्या आईवडिलांप्रमाणेच वुध्दापकाळी अंतरूणावर खिळलेले असतील का? हे दुष्टचक्र कधी संपेल?

आपण आपल्या परिसरात अशा बऱ्याच नारायणांना भेटले असाल. किंवा आपल्या शेजारच्या किंवा आपल्या स्वतःच्या कुटुंबातील अशाच परिस्थितीत तुम्हाला कदाचित अनुभव असेल. ही परिस्थिती सुधारणे नक्कीच शक्य आहे जेणेकरून आपण समाधानकारक जीवन जगू शकाल आणि आपल्या पुढच्या पिढीला तुलनेनं उत्तम जगात यावे यासाठी प्रयत्न करू शकाल…