अशक्य काहीच नाही

आयुष्याच्या प्रारंभिक अवधीत एकंदर नियोजन आणि उद्दिष्ट ठरविण्या विषयी जागरुकता खूप काही करू शकते. प्रारंभिक अवस्था म्हणजे जेव्हा आपण आपला करियर सुरू करता, लग्न करता आणि कौटुंबिक प्रवास सुरू करता. या टप्प्यावर आपल्याला उपलब्ध संसाधनाचा मुल्यांकन करण्याची आवश्यकता आहे आणि आपण स्वत: ला आणि आपल्या पुढच्या पिढीला कुठे घेऊन जाणार याची योजना बनविणे महत्वाचे आहे.

येथे आपण ‘कुटुंब नियोजन’ संकल्पना, ज्याचा अर्थ ‘लहान कुटुंब आनंदी कुटुंब’, याबद्दल बोलत नाही आहोत. येथे आपले उद्दिष्ट अगदी सोपे आहे. आपल्या क्षमतेचा अंदाज घ्या – क्षमता जी कुटुंबाची व्यवस्था करण्याची आणि आपल्या पुढच्या पिढीला पुढील स्तरावर उन्नत करण्यास सक्षम करण्याची. मग तुमच्याकडे १, २ किंवा अनेक मुलं असू शकतात जिथे तुम्ही प्रत्येक मुलाला किंवा मुलीला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी व त्यांना आधार देण्यास सक्षम आहात.

नियोजन कसे कराल

आपण आपले करिअर सुरू करून कमावते होता तेव्हा, आपण खालील पद्धतीने आपल्या वर्तमान परिस्थितीचे विश्लेषण करणे आवश्यक असते. आपण विवाहित असल्यास, आपल्या जोडीदाराबरोबर हे नियोजन करणे महत्वाचे ठरते.

  • आपले आईवडील आपल्या बरोबर राहतात का? त्यांच्या दैनंदिन गरजा आणि वैद्यकीय खर्चासाठी त्यांची स्वतःची काही बचत आहे का किंवा सध्या त्यांना दरमहा कमाई आहे का? ते आपल्यावर पूर्णपणे अथवा अंशतः अवलंबून आहेत?
  • तुमच्याकडे कोणी भावंडे आहेत ज्यांच्या शिक्षणाची, नोकरी मिळवून देण्याची आणि त्यांचे लग्न करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे का?
  • आपले शिक्षण काय आहे? आपला वर्तमान व्यवसाय किंवा नोकरी काय आहे? आपण आपल्या व्यवसायात किंवा नोकरीत कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना करीत आहात? यातून मार्ग काढण्यासाठी काय उपाय करता येतील याची आपल्याला कल्पना आहे का? आपण त्या इच्छित परिस्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट करू शकता का?
  • तुमच्या मुलांना वाढवण्याची तुमची योजना काय आहे? तुम्हाला आत्तापर्यंत ज्या अडचणी आल्या तशा अडथळ्यांना तुमच्या मुलांना तोंड द्यावे लागणार नाही यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता? त्यासाठी त्यांना कशाप्रकारचे शिक्षण देणे आवश्यक आहे?
  • तुमच्या कुटुंबाची आणि मुलांची योग्य स्थिती साध्य करण्यासाठी, तुम्हाला कोणत्या प्रकारची आर्थिक योजना आखावी लागेल?
  • तुम्ही आपल्या कुटुंबाची तब्येत आणि तंदुरुस्ती उत्तम राखण्यासाठी कशी योजना कराल?
  • तुम्ही निवृत्त झाल्यावर आर्थिकद्रिष्टया स्वावलंबी होण्यसाठी आणि आपल्या मुलांवर अवलंबून लागू नये यासाठी योजना कशी कराल?

वरील सर्व विचार लक्षात घेता, तुमचे कुटुंब केवढे मोठे असावे असे तुम्हाला वाटते?

योग्य शिक्षणाचे नियोजन

तुम्ही राहता त्या भागात कोणत्या शिक्षण सुविधा उपलब्ध आहात? शाळा आणि महाविद्यालये कोणती आहेत? आपण आपल्या मुलांनी मोठे झाल्यावर काय नोकरी किंवा व्यवसाय करावा अशी तुमची आकांक्षा आहे? आपल्यासाठी या उद्दीष्टापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कोणत्या शिक्षणाची आवश्यकता आहे?

मूलभूत शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाच्या व्यतिरिक्त, तुम्ही सरकारी अभ्यासक्रमांची मोठी यादी बघितली आहे का? हे अभ्यासक्रम नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी महत्वाचे कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी मदत करतात. सरकारी योजनांच्या तपशीलांसाठी या वेबसाईटच्या ‘उपयुक्त माहिती’ या विभागाला भेट द्या.

चांगले स्वास्थ्य आणि आरोग्य यासाठी नियोजन

आपले आईवडील एखाद्या प्रमुख आजार पासून त्रस्त आहेत का? आपण अशाप्रकारच्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकता? आपल्याला योग्य आरोग्य आणि तंदुरुस्त स्थिती साध्य करण्यासाठी काय पोषण आणि व्यायाम यांची आवश्यक आहे याची माहिती आहे?

आपण आपल्या घराच्या आसपास असलेल्या व्यायामाच्या सुविधा किंवा व्ययामशाळांचा योग्य उपयोग करत आहात का? व्यायाम करण्यासाठी वेळ काढण्यासाठी आपण प्रयत्न करता का? आपल्या मुलांना योग्य आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत शिक्षित करण्याची कशी योजना आहे?

आपण व्यसनाधीन आहेत का? व्यसनांमुळे आपल्या आर्थिक, शारिरीक आणि कौटुंबिक परिस्थिती वर परिणाम होतो याची तुम्हाला जाणीव आहे का? व्यसने सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहेत?

योग्य आर्थिक नियोजन

आपली मासिक कमाई सध्या काय आहे? आपली कॊटुंबिक जबाबदारी, ज्यामध्ये तुमची मुले, पालक आणि भावंडे असतील, निभावण्यासाठी आपला मासिक खर्च काय आहे? आपल्या संपूर्ण आयुष्यात मुलांचे शिक्षण, विवाह, तुमची सेवानिवृत्ती यासारख्या मोठ्या आर्थिक गरजा काय आहेत? या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी तुम्ही पैसे कसे बचत करणार आहात? आपण आपली बचत योग्य मालमत्तेत गुंतवणूक करत आहात जे आपले उद्दीष्ट पूर्ण करण्यास मदत करू शकेल?

वर बघितलेल्या नियोजनासाठी माहिती मिळविण्यासाठीया वेबसाईटच्या ‘उपयुक्त माहिती‘ विभागाला भेट द्या. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया आम्हाला जरूर लिहा.

आणि हो, तुमच्या पुढच्या पिढीला अधिक उंचीवर नेण्यात यशस्वी झालेल्या कुटुंबांच्या यशोगाथा समजून घेण्यासाठी या वेबसाइटच्या ‘प्रेरणादायक गोष्टी‘ विभागाला अवश्य भेट द्या. आपल्या वर्तमान परिस्थितीशी संबंधित एकतरी कथा आपल्याला नक्कीच सापडेल.

आणि तुमच्या सभोवताली असलेल्या कोणत्याही प्रेरणादायक गोष्टी आम्हाला जरूर कळवा – अगदी तुमची स्वतःची गोष्ट सुद्धा!